मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दमा असूनही दम-दार गाणारे विष्णुबुवा...

जे गरिब पर हित करे, ते रहीम बड लोग। कहाँ सुदामा बापुरो, कृष्ण मिताई जोग।। अर्थात- जे लोक गरीबांचे भले करतात, ते सर्वात मोठे. मोठे ते नाहीत, जे एखाद्या मोठ्या पदावर असतील...। इथे रहीमदासजींनी कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण देऊन सांगितलंय की सुदामा गरीब असूनही, कृष्णाने त्याच्याशी मैत्री केली होती..! सुदामा कृष्णाचा 'जिवलग मित्र' होता. रहीम यांचा हा दोहा अचानक आठवला! निमित्त होतं, ते म्हणजे दारासमोर बसून मधुर आवाजात अभंग सादर करणार्‍या भिक्षेकर्‍याचं...! वयाची सत्तरी गाठलेला मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही दारोदार फिरून भिक्षा मागणारा हा भिक्षेकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळे अभंग, भजनं सादर करून मिळेल त्या पैशावर हा गृहस्थ कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालवतोय. विष्णुबुवा असं यांचं नाव असून काही दिवसांपासून ते इंदूरमधल्या विशेषतः महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरून मराठी बांधवांकडून मिळतील ते पैसे, कपडे आदी वस्तूंद्वारे आपला उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरल्यामुळे मराठीत बोलता येतं आणि दोन पैसे जास्त मिळतात अशी विष्णुबुवांची भावना आहे. ते मूळचे

संवेदनशील मतदान केंद्रांबाबत सतर्कता बाळगावी- राज्य निवडणूक आयुक्त

पुणे, दि. 16 : ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिल्या.           पुणे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 63 रिक्त जागांच्या होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी 29 मार्च 2013 रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात श्रीमती सत्यनारायण यांनी आज येथे आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी विकास देशमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आदींसह अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.            मतदान यंत्रे, मार्कर पेन व इतर मतदानाच्या साहित्याबाबत आढावा घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक असलेल्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संबंधितांना निवडणुकांची माहिती द्यावी. तसेच पेडन्यूजबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त केल्या असून

जागतिक महिला दिन संदेश, शुभेच्छा

English madhe LADY, Marathit MAHILA, Hindi madhe NARI... Yanchi saath nasel tar, aahe baatch Adhuri... Theva lakshat ek goshta, ek na ek divas padel hi Sampurna Duniyela BHARI...!!! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechha. इंग्रजी मध्ये लेडी, मराठीत महिला, हिंदी मध्ये नारी... यांची साथ नसेल तर, आहे बातच अधुरी... ठेवा लक्षात एक गोष्ट, एक ना एक दिवस पडेल ही संपूर्ण दुनियेला भारी...!!! जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

अकोला येथे काँग्रेस मेळावा उत्साहात

अकोला, दि. 2 मार्च: आजवर केवळ काँग्रेसनेच जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मीलची जागा देण्याचा निर्णय असो वा देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेस पक्षानेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य काँग्रेस भविष्यातही अशाच प्रकारे पूर्ण करीत राहील, असे मोहन प्रकाशजी यांनी म्हटले आहे. अकोला येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात आयोजित अमरावती विभागीय काँग्रेस मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनिस अहमद, अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व

नवी मुंबई मेट्रो – आता वाटचाल 21 व्या शतकाच्याही पुढे

स्वयंपूर्ण नवी मुंबईतील भविष्याची गती सांभाळणारा तर्कसंगत आणि सुयोग्य प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो. परिवहनाच्या बृहद आराखड्यावर आधारीत बहुपर्यायी दळणवळण व्यवस्थांना पूर्णत्व देणे हाच मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा उद्देश. दिल्ली मेट्रो रेल्वे कॅार्पोरेशन आणि ली असोसिएट्‌स साऊथ एशिया यांच्या सूचनाबरहूकुम नवी मुंबईत पाच मार्गांचे जाळे विणले जाणार आहे. पूर्णत: उन्नत मार्गिकेवरून धावणारी ही मेट्रो पहिल्या टप्प्यात 11 कि.मी. अंतराच्या बेलापूर ते पेंधर क्षेत्रातील परिवहनाला नवे परिमाण देईल यात शंका नाही. रेल्वेने निर्धारित केलेल्या बांधकाम दर्जाच्या परिमाणांची काटेकोर पूर्णता जागे अभावी, जागेच्या पूर्व-नियोजित वापरामुळे अथवा आरक्षणामुळे होऊ न शकल्याने नवी मुंबईतील काही नोडस्‌ रेल्वे मार्गापासून वंचित राहिले. जनतेला सर्व सुविधा पुरविण्याचा वसा घेतलेल्या, नागरिकांच्या समस्यांची, मागण्यांची प्राथम्याने दखल घेणाऱ्या सिडको प्रशासनानं त्यावर काढलेला तोडगा म्हणजे नवी मुंबई मेट्रो. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या शक्यतेबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून प्राप्त होताच सिडकोने व्