मुख्य सामग्रीवर वगळा

अभिनेता भारत गणेशपुरे यांना "विदर्भ आयकॉन" पुरस्कार

(नवी मुंबई)- अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने गेली सहा वर्षे सातत्याने "सन्मान रजनी" चे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुर्वी कला,साहित्य,चित्रपट,संगीत,नृत्य,गजल,सहकार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावर्षी "अशोकपुष्प पुरस्कार सन्मान रजनी" चे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार, दिनांक २४ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. या सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांना विदर्भ आयकॉन हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अभिनेता भारत गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले असून त्यांच्या भूमिका विविधरंगी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तसेच नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेता संतोष पवार यांना "विनोद रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केदार शिंदे दिग्दर्शित "तु तु मी मी" या नाटकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चौदा विविध रंगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणून पोलिस लाईन या चित्रपटाच्या निर्मा त्या रुपाली पवार व वैशाली पवार आणि प्रस्तुतकर्ते श्रीधर चारी यांचा सत्कार करण्यात येईल, यावेळी या चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना "कलारत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या "खुमखूमी" या कार्यक्रमास २५ वर्षे पूर्ण होत असून या कार्याक्रमाचे देश विदेशात प्रयोग गाजलेत. "लोककलारत्न" हा पुरस्कार नंदेश विठ्ठल उमप यांना प्रदान करण्यात येईल. पोलीसदल सेवारत्न पुरस्काराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे तसेच पत्रकारिता सेवारत्न पुरस्कारने विलास बढे यांना सन्मानित करण्यात येईल. "विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या मान्यवरांचा अशोकपुष्प सन्मान रजनीच्या माध्यमातून गौरव करणे म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे असते व इतरांना ती प्रेरणा असते.गेली सहा वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये नवी मुंबईतील व्यक्तींचा ही समावेश आहे. सन्मान रजनीच्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याचे आयोजक उमेश चौधरी व अनघा लाड यांनी सांगितले. यावेळी नवी मुंबई क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये दशरथ शिंगाडे (उद्योगश्री), तुषार गोगरी व विलास खुल्लर (उद्योगश्री जाहिरात क्षेत्र), विनय खडसे (तरुण उद्योजक),आबा रणवरे (पर्यावरण मित्र), मनमीत सिंग (गायक), गंगासिंग राजपूत (युवा पत्रकार),सानिध पुजारी (युवा पत्रकार), अनिस दीन (फॅशन ),किरण सावंत (मनोरंजन).

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012