मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी

तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे मार्गदर्शन श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना केले. स्वच्छता हि मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून आपण सर्वांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्यासाठी कंपनी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कंपनीचे उपव्यवस्थापक एस के भटनागर यांनी सांगितले, या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे साचीनदादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स उपव्यवस्थापक एस के भटनागर, अविनाश खांदेतोडे, एस के चौधरी, कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सदस्य सहभागी झाले होते. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे, येत्या १ जुलैस प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012