मुख्य सामग्रीवर वगळा

तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळा

(नवी मुंबई)- चित्रपट निर्मिती या क्षेत्रात तरुण वर्ग मोठया प्रमाणात आकर्षित होत आहे, परंतु त्यांना असलेल्या अपूर्ण ज्ञानामुळे त्यांची दिशाभूल केली जाते. हे सर्व लक्षात घेऊन अनघा इव्हेंट्स व सिनेबझ अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स च्या वतीने तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक इम्तियाज हुसैन, प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर तसेच दिग्दर्शक मिलिंद कवडे, आणि दिग्दर्शक रमेश भटनागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.ही कार्यशाळा दिनांक २२, २३ आणि २४ जुलै २०१६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत चित्रपट निर्मितीत ज्यांना आवड आहे त्यांना सहभाग घेता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येईल. ही कार्यशाळा सिनेबझ अकॅडमी, योग विद्या निकेतन, वाशी डेपो जवळ, सेक्टर ९ (अ), वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत असून इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . २२ जुलै रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन होईल तसेच या दिवशी मिलिंद कवडे दिग्दर्शित "शिनमा" या चित्रपटाचे दुपारी २ वाजता स्क्रिनिंग करण्यात येईल. "या कार्यशाळेच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन कसे असावे? संकलन, संवाद लेखन, छायाचित्रण याबाबतचे सखोल ज्ञान देण्यात येईल. चित्रपटाचे स्क्रीनिंग, दिग्दर्शकासमवेत चर्चा, चित्रीकरण स्थळाला भेट, तसेच कॅमेऱ्याची हाताळणी याबाबत सहभागी विध्यार्थाना ज्ञान मिळणार आहे" असे सिनेबझ अकॅडमीचे संचालक किरण सावंत यांनी सांगितले. "इम्तियाज हुसैन" यांची लेखक, दिग्दर्शक, व संवाद लेखक म्हणून हिंदी सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी परिंदा, वास्तव, अस्तित्व, गुलाम-ए-मुस्तफा, अनर्थ, इस रात की सुबह नही, ये दिलं आशना है. या चित्रपटांचे संवाद लेखन केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटविला आहे. हॉलिवूड चित्रपट "द फिल्ड" मध्ये त्यांनी हिंदी संवाद लेखन केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून इम्तियाज हुसैन यांनी कामगिरी बजावली आहे. "विजय पाटकर" हे हिंदी व मराठी सिने क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे नाव आहे. त्यांनी तेजाब, गोलमाल-3, ऑल द बेस्ट, सिंघम, तीस मार खान, अपना सपना मनी मनी, वॉन्टेड, रघु रोमियो, क्या कूल हैं हम, धमाल व अन्य हिंदी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत तर त्यांनी मुख्य भूमिका करतानाच लावू का लाथ, सगळं करून भागले, मोहर, चष्मेबहाद्दूर व अन्य चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली आहे. “मिलिंद कवडे” यांचे मराठी चित्रपट गाजले असून त्यांचा ५ ऑगस्ट रोजी 1234 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यांच्या "येड्यांची जत्रा" या चित्रपटाने शहरी तसेच ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आणि हा चित्रपट अनेकदा प्रादेशिक चित्रवाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्यांच्या नावावर दिग्दर्शक म्हणून 4 इडियट्स, जस्ट गंमत, येड्यांची जत्रा, 1234 व शिनमा हे महत्वपूर्ण चित्रपट आहेत. यासर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन सहभागी व्यक्तींना मिळणार आहे. आपले नाव नोंदणी करिता इच्छूकांनी संपर्क साधावा -02267932858 / 8655093555 अधिक माहिती करिता संपर्क : अनघा लाड 7208480599

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012